< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); कुर्ला येथे शालेय मुलांच्या कबड्डी शिबिराचा समारोप – Sport Splus

कुर्ला येथे शालेय मुलांच्या कबड्डी शिबिराचा समारोप

  • By admin
  • May 19, 2025
  • 0
  • 35 Views
Spread the love

मुंबई ः कुर्ला पश्चिम येथील प्रसिद्ध गांधी मैदानात नुकतेच शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

५० पेक्षा जास्त शालेय मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात अडीच तास या मुलांना कबड्डी खेळाचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात कबड्डी सराव कसा करावा, कबड्डी खेळाचे कौशल्य कसे वाढवावे, ते वाढवण्यासाठी कोणते व्यायाम प्रकार करावेत याचे मार्गदर्शन रोहित मोरे, वेदांत महाडिक, ओंकार वेताळ यांनी केले. निवेदक प्रतीक गाढवे यांनी मुलांना या खेळातील विविध कौशल्य प्रात्यक्षिकासह दाखवून दिली. कबड्डीतील नियमांची माहिती गौरी महाडीक, प्रतीक्षा गाडगे या मुंबई उपनगरच्या पंचांनी करून दिली.

या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू सचिन आयरे, एअर इंडियाचे खेळाडू नितीन घाग, बीपीसीएचे सदस्य दीपक कांदळगावकर, सन्मित्र क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू सोहम पुंदे, राष्ट्रीय पंच महादेव घाणेकर यांनी भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. सदर शिबिर आयोजन करण्यासाठी गौरीशंकर क्रीडा मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व शिबिरार्थींना पदके दिली. तसेच त्यांच्या शाळांना देखील गौरवचिन्ह भेट देण्यात आली. दररोज खेळाडूंना खाऊचे वाटप करण्यात आले यंदा प्रथमच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भावी काळात असेच नियमित शिबिराचे व त्याबरोबरच या मुलांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी मध्ये स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे असे क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *