कराटे खेळामुळे रक्षणकर्ती युवा पिढी तयार होते ः मोहन मोहिते

  • By admin
  • May 19, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

वर्धा ः आजच्या युगात कराटे सारख्या खेळाचा नियमित सराव केल्यास शालेय जीवनात राज्य, राष्ट्रीय प्राविण्य प्राप्त केल्यास बोर्डाच्या परीक्षेत वाढीव गुण व पुढे शासकीय नोकरी भरतीत पाच टक्के आरक्षणाचा फायदा घेत नोकरी मिळवण्यात फायदा तर होतोच याशिवाय कराटे खेळाचा नियमित सराव केल्याने स्वतःचे, समाजाचे व पर्यायी देशाचे रक्षणकर्ते युवापिढी तयार होते, असे प्रतिपादन स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहन मोहिते यांनी व्यक्त केले.

मोहन मोहिते हे स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संचालक आणि विश्वसिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आहुजा, संस्था संचालक आणि दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश खंडार तर मुख्य परीक्षक म्हणून स्पोर्ट शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश भोंगाडे, सह परीक्षक वाणी साहू, तेजस निवल, आयोजक पूजा गोसटकर, अंकुश गिरडे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

या परीक्षेचे आयोजन दोन भागात केले होते. शारीरिक चाचणी व बौद्धिक चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट देऊन सन्मानित केल्या जाईल. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पाच दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलक लक्षणे यांनी केले. हेमाताई राठोड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *