
लखनौ ः आपीएलच्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या ६१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा याने पुन्हा एकदा आपल्या वादळी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली, अभिषेकने सामन्यात फक्त २० चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली, त्याच्या खेळीत अभिषेक ४ चौकार आणि ६ षटकार मारण्यात यशस्वी झाला. अभिषेकच्या खेळीच्या जोरावरच हैदराबादला ६ विकेट्सनी सामना जिंकता आला. आपल्या धमाकेदार खेळीदरम्यान अभिषेकने अनेक विक्रम केले. आयपीएलच्या इतिहासात २० चेंडूंपेक्षा कमी वेळात चार अर्धशतके झळकावण्याचा पराक्रम करणारा अभिषेक हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.
अभिषेकच्या आधी आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने असा पराक्रम केला नव्हता. अभिषेक शर्माने २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत, २०२५ मध्ये लखनौविरुद्ध १८ चेंडूत आणि १९ चेंडूत (२०२४ मध्ये) अर्धशतके झळकावली आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतके झळकावली. याशिवाय, अभिषेक शर्मा २०२४ पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. २०२४ पासून आतापर्यंत अभिषेकने आयपीएलमध्ये २७ डाव खेळले आहेत आणि एकूण ६५ षटकार मारले आहेत.
अभिषेक आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना २००+ च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना, अभिषेकने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या आहेत. त्याच्या मागे सूर्यकुमार यादव आहे, ज्याने लक्ष्याचा पाठलाग करताना २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ५६४ धावा करण्याचा विक्रम केला आहे.
भारतीयांचे सर्वाधिक आयपीएल षटकार (२०२४ पासून)
६५* – अभिषेक शर्मा (२७ डाव)६० – रियान पराग (२७ डाव)
६० – विराट कोहली (२६ डाव)
४५ – शिवम दुबे (२६ डाव)
४५ – प्रभसिमरन सिंग (२३ डाव)
४४. सूर्यकुमार यादव (२३ डाव)
४३ – रजत पाटीदार (२३ डाव)
४२ – यशस्वी जैस्वाल (२८ डाव)
आयपीएलमध्ये २००+ धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा
५७३* – अभिषेक शर्मा
५६४ – सूर्यकुमार यादव
५३८ – नितीश राणा
५२० – विराट कोहली
५१९ – संजू सॅमसन
५०८ – फाफ डु प्लेसिस