
दिल्ली ः आक्रमक फलंदाज शुभमन गिल याने टी २० मध्ये खळबळ उडवली असून विराट कोहलीचा विक्रम मोडत जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवली आहे.
शुभमन गिलला विराट कोहलीचा उत्तराधिकारी का मानले जाते याचे आणखी एक उदाहरण आयपीएलच्या ६० व्या सामन्यात दिसून आले, जेव्हा गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत गिलने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला. टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याच्या बाबतीत शुभमन गिलने आता कोहलीला मागे टाकले आहे. गिलने १५४ डावांमध्ये टी २० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या, तर कोहलीने १६७ डावांमध्ये टी २० मध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून टी २० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने फक्त १४३ डावांमध्ये ५००० टी २० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता.
सर्वात जलद ५,००० टी २० धावा करणारे भारतीय खेळाडू
१४३ डाव – केएल राहुल
१५४ डाव – शुभमन गिल*
१६७ डाव – विराट कोहली
१७३ डाव – सुरेश रैना
त्याच वेळी, एकूण टी २० मध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी-२० मध्ये १३२ डावांमध्ये ही कामगिरी केली. गिल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.
टी २० मध्ये ५,००० धावा करणारा सर्वात जलद फलंदाज
१३२ डाव – ख्रिस गेल
१४३ डाव – केएल राहुल
१४४ डाव – शॉन मार्श
१४४ डाव – डेव्हॉन कॉनवे
१४५ डाव – बाबर आझम
१५४ डाव – शुभमन गिल*