
भारतीय अंंडर २३ संघाच्या शिबिराचा समारोप
जळगाव ः आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धा पूर्व भारतीय संघाचे सराव शिबीर जळगाव येथे संपन्न झाले. या शिबिरात भारतीय संघाने कसून सराव केला आहे. भारतीय संघ बँकॉक येथे २ ते ५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱया आशियाई चषक सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.
सॉफ्टबॉल फेडरेशनची तिसरी २३ वर्षांखालील मुलांची आशियाई चषक सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप, बँकॉक, थायलंड येथे २ ते ५ जून २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार असून तिसरे स्पर्धा पूर्व सराव शिबीर जळगाव येथे महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या यजमानपदाखाली १२ ते १८ मे दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांचे हस्ते किट गणवेश वाटून शिबिराचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी जळगाव भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, जगदीश चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्य सचिव डॉ प्रदीप तळवेलकर यांनी सूत्रसंचालन केले व भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
भारतीय संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे पार पडले. प्रशिक्षण शिबिरात राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी व प्रीतिश पाटील यांचे संघास मार्गदर्शन लाभले.
अंडर २३ भारतीय सॉफ्टबॉल संघ
शिवकुमार माळी, वेदांत राऊत, प्रवीण चव्हाण, रोहित मेश्राम, राकेश कडती, राकेश दास, किरण जका, नवीन मेघवत, महेश बुल्ले, मोहम्मद याशीर, सुरज के, सोहेल खान, उत्तम कुमार, रघु दास, फैजान बशीर, सरबजीत सोधी. प्रशिक्षक – पवन कुमार (दिल्ली), किशोर चौधरी (महाराष्ट्र), व्यवस्थापक – एल आर मौर्य.