
बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
छत्रपती संभाजीनगर ः पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या समारंभास बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष मेहनत घेऊन आपला अभ्यासक्रम यशश्वीरित्या पूर्ण केला त्यानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून प्राप्त पदवीचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात एकूण १३० विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.

या पदवी वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स पंच आणि प्रशिक्षक तसेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळ संचलित शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मकरंद जोशी आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे स्कूल ऑफ एज्युकेशनल सायन्सचे विभाग प्रमुख व युजीसी यंग सायंटिस्ट पुरस्कार प्राप्त एनसीटीईचे सल्लागार व एनईपीचे मेंटर डॉ सिंकू कुमार सिंग हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी हे होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभाचे सूत्रसंचालन स्मिता बगाटे यांनी केले तर राहुल आंबेकर यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, प्रा संतोष कांबळे, प्रा श्रीकांत गवई, ग्रंथपाल डॉ श्यामला यादव, अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.