
जागतिक टेबल टेनिस स्पर्धा
दोहा ः जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू मनिका बत्रा, दिया चितळे आणि मानव ठक्कर यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेत मानव ठक्कर याने जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या हरिमोटो टोमोकाझूला आव्हान दिले आणि त्यानंतर राउंड ऑफ ६४ मध्ये पराभव पत्करावा लागला. पण स्टार खेळाडू मनिका बत्राने खालच्या क्रमांकाच्या पार्क गह्येओनविरुद्ध सरासरी कामगिरी केली आणि मंगळवारी जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतून बाहेर पडली.
जागतिक क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेल्या ठक्करने तिसऱ्या आणि पाचव्या गेममध्ये त्याच्या अनुभवी जपानी प्रतिस्पर्ध्याला जोरदार झुंज दिली पण तरीही त्याला ११-१३, ३-११, ११-९, ६-११, ११-९, ३-११ असा पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीत ४६ व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाला जागतिक क्रमवारीत १३० व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या पार्कविरुद्ध अजिबात लयीत दिसली नाही. मनिकाला ८-११, ७-११, ५-११, ८-११ असा पराभव पत्करावा लागला. मनिकाचा पराभव तिच्या फोरहँडमधील अनेक अनपेक्षित चुकांमुळे झाला. जागतिक क्रमवारीत ८८ व्या स्थानावर असलेल्या दिया चितळेलाही चायनीज तैपेईच्या चेन आय चिंगकडून ३-७, ७-११, ६-११, ११-६, ५-११ असा पराभव पत्करावा लागला.