बीड जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेतर्फे आष्टी येथे निवड चाचणी

  • By admin
  • May 21, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

बीड ः  महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने मुंबई-पुणे येथे आयोजित वरिष्ठ महिला आणि पुरुष गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी आष्टी येथे १ जून रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. 

बीड जिल्हा संघाची निवड करण्याकरिता आष्टी येथील डाॅ बी डी हंबर्डे महाविद्यालयात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे. १ जून रोजी सीनियर पुरुष व महिला गटाची निवड चाचणी सकाळी ७ वाजता सुरू होईल.
महाराष्ट्र अॅथलॅटिक्स असोसिएशनच्या वतीने नियुक्त  केलेले डाॅ भागचंद्र सानप, दिनेश पवार, डॉ संतोष वनगुजरे, प्रा रवींद्र खरात व प्रा सुखदेव माने या पाच सदस्यांची बीड जिल्हा अॅथलेटिक्स संघाची निवड करण्याकरिता सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, १०००० मीटर, ३००० मीटर स्टीपलचेस, लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, हातोडा फेक, ४ बाय १०० मीटर रिले, ४ बाय ४०० मीटर रिले व २० किमी चालणे इत्यादी गटात या स्पर्धा होणार आहेत. 

या स्पर्धेत विजयी होणाऱया खेळाडूंची निवड बीड जिल्हा संघात केली जाणार आहे. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म दाखला (नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो, १०वी प्रमाणपत्र सोबत आणावे. जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंना एएफआयची यूआयडी नंंबर काढणे अनिवार्य राहील. या स्पर्धेत १८ वर्षांवरील फक्त बीड जिल्ह्यातील खेळाडूच सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील पात्र व इच्छुक खेळाडूंनी  अधिक माहितीसाठी दिनेश पवार (8308378143), डाॅ संतोष वनगुजरे (7709135151 यांच्याकडे ३० मेपर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *