
नवी दिल्ली ः राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल स्पर्धेत शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करुन विजयाने सांगता केेली. या विजयाचा हिरो ठरला तो युवा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वैभवची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत राहुल द्रविड यांनी वैभव सूर्यवंशी याला पुढील हंगामात आपल्याला अधिक चांगले खेळावे लागेल असा सल्ला दिला.
आयपीएल २०२५ युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसाठी खूप छान होते. वैभवने या मोसमात २५२ धावा केल्या. वैभव आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही ठरला. आयपीएलने वैभवला स्टार बनवले आहे. सूर्यवंशी याने हंगामाचा शेवट अर्धशतकाने केला. सीएसके विरुद्धच्या सामन्यात सूर्यवंशीने ५७ धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वैभव सूर्यवंशीची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान, वैभवने आयपीएल स्पर्धेत पहिले शतक झळकावताना त्याच्यासोबत काय घडले याबद्दल सांगितले.

वैभव म्हणाला की, त्यावेळी मला खूप फोन येत होते. ५०० हून अधिक मिस्ड कॉल आले. लोकांना माझ्याशी बोलायचे होते पण मी ४ दिवसांपासून माझा फोन बंद केला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी बोलताना सांगितले. वैभव याने त्याच्या पहिल्या शतकानंतर लोक त्याला कसे फोन करत होते आणि अभिनंदन करत होते याबद्दल सांगितले. वैभव म्हणाला, “पहिल्या शतकानंतर, इतक्या लोकांनी त्याला फोन आणि मेसेज केले, ५०० हून अधिक मिस्ड कॉल आले, पण मी माझा फोन बंद केला आहे. मला या सगळ्यात रस नाही. मी तुम्हाला हे देखील सांगितले होते. शतकानंतर अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला, पण मला ते फारसे आवडले नाही… मी माझा फोन २-४ दिवस बंद ठेवला. मला जास्त लोकांमध्ये राहणे आवडत नाही… फक्त माझे कुटुंब आणि काही मित्र, ते पुरेसे आहे.”
पुढच्या हंगामात आपल्याला चांगले खेळावे लागेल – राहुल द्रविड
याशिवाय, राहुल द्रविडने मुलाखतीत वैभवला सांगितले की, “पुढच्या हंगामात तुम्हाला आणखी चांगले खेळावे लागेल. सर्व गोलंदाज तुमच्याविरुद्ध अधिक रणनीती आखतील. त्यांनी या हंगामात तुम्हाला पाहिले आहे. पुढच्या हंगामात, ते तुम्हाला शक्य तितक्या लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला आतापासूनच भविष्यासाठी तयारी सुरू करावी लागेल.”
त्याच वेळी, वैभवने राहुल द्रविडला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की आता तो अंडर १९ संघात खेळणार आहे. १९ वर्षांखालील संघाचाही कॅम्प होणार आहे, मला आता तिथे जायचे आहे. मुलाखतीत, वैभव सूर्यवंशी यांनी राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले.