मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते संध्याराणी बंडगर यांचा सन्मान

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 75 Views
Spread the love

सोलापूर ः अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षांत लॉन टेनिस या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यास पदके मिळवून देऊन राज्याचे नावलौकिक वाढवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या मुख्य लेखापाल संध्याराणी बंडगर यांचा सचिवालय जिमखाना, मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हा गौरव माझे प्रशिक्षक सुधीर सालगुडे, उमेश बडगेर, मार्गदर्शक राजीव देसाई यांचा देखील असल्याच्या भावना संध्याराणी बंडगर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

त्याच प्रमाणे माझ्या या यशात माझ्या कुटुंबियांचे देखील मोठे योगदान असल्याचे संध्याराणी यांनी नमूद केले. संध्याराणी बंडगर यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सुतार, सचिव सुंदर अय्यर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *