अहिल्यानगर येथे शनिवारी अंडर ९ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 144 Views
Spread the love

अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत ९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २४ मे रोजी रंगणार आहे.

शहरातील गायत्री मंगल कार्यालय, महाजन गल्ली येथे या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे नियोजन केले असून शनिवार (२४ मे) सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. सोलापूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे २ मुले व २ मुली म्हणजेच प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील.

अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी ८०० रुपये संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल. पहिल्या पाच खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदरील स्पर्धा ९ वर्षांखालील मुले व मुली खेळाडूंसाठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी सोबत आणावे. सर्व सहभागी खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेश ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपवर स्वीकारले जाणार आहेत.

स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहिल्या नगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता सचिव यशवंत बापट (९३२६०९२५०१), पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८), देवेंद्र ढोकळे (८६००४१२६३३), प्रशांत धंगेकर (९९२१३७७९८८) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *