
छत्रपती संभाजीनगर ः पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २६ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमाच्या एकूण २६ विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी विभागीय रक्तपेढी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या मदतीने रक्त संकलन करण्यात आले. विभागीय रक्तपेढीत कार्यरत असलेल्या तायडे आणि अनुसया घोषेकर यांनी रक्तदान शिबीर आयोजनासाठी मदत केली.
रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी, प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, प्रा संतोष कांबळे, प्रा जी सूर्यकांत, ग्रंथपाल डॉ श्यामला यादव, अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.