
मोहम्मद तांबोळी, ईश्वरी तोडकर कर्णधार
भंडारा ः भारतीय नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अल्पाइन अकॅडमी (इंदूर) मध्य प्रदेश येथे २५ ते २८ मे दरम्यान होणाऱया ३१व्या सबज्युनिअर राष्ट्रीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा नेटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे.
भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी मधून निवड समिती सदस्य डॉ दिलीप जयस्वाल (चेअरमन), श्याम देशमुख (संयोजक), समीर सिकिलकर, महेशकुमार काळदाते, शिवानी सांब्रेकर यांनी दोन्ही संघ जाहीर केले.
भंडारा येथील प्रोगेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या मैदानावर २० ते २३ मे पर्यंत राष्ट्रीय स्पर्धा पूर्व शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिनभाई कामदार, महासचिव डॉ ललित जीवानी, कोषाध्यक्ष एस एन मूर्ती, स्पर्धा निरीक्षक विलास पराते, निवड समितीचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल, स्पर्धा संयोजक श्याम देशमुख, सभासद स्नेहदीप कोकाटे तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अध्यक्ष व सचिव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचा मुलांचा संघ
मोहम्मद तांबोळी (कर्णधार), आदर्श घुगे (उपकर्णधार), अथर्व लाडे, तन्मय हाडुळे, उज्ज्वल मस्के, मुदस्सर सय्यद, आर्यन जलोरिया, वसीम तांबोळी, श्रीपाद परळीकर, जयंत भुते, मंचित भगत, समय नितनवरे. प्रशिक्षक : ओंकार नकै, व्यवस्थापक : लोकेश ताले.
महाराष्ट्राचा मुलींचा संघ
ईश्वरी तोडकर (कर्णधार), भक्ती गावंडे (उपकर्णधार), शाइस्ता तांबोळी, श्वेता राठोड, प्रणिता हाडूळे, संस्कृती जाधव, अंकिता जगताप, स्नेहांजली सोनवणे, प्रवीणा ढबाले, आरती ढबाले, निधी मदनकर, श्वेता पाटील. प्रशिक्षक : नीलिमा दास, व्यवस्थापक : मिताली गणवीर.