
मुंबई ः २१व्या आशियाई सीनियर कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ३१ सदस्यीय भारतीय पथक जाहीर करण्यात आले आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे होणाऱ्या आशियाई पॅरा-कराटे चॅम्पियनशिपमध्ये यशासाठी हे पथक सज्ज झाले आहे.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पाठिंब्याने टीमला प्रेरणा मिळाली आहे. प्रतिष्ठित जागतिक कराटे फेडरेशन, आशियाई कराटे फेडरेशन, राष्ट्रकुल कराटे फेडरेशन आणि दक्षिण आशियाई कराटे फेडरेशन यांच्याशी संलग्न असलेल्या “कराटे इंडिया ऑर्गनायझेशन”चे प्रतिनिधित्व करणारा भारतीय राष्ट्रीय वरिष्ठ कराटे संघ उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे पोहोचला आहे.
युनुसुबोद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या २१ व्या एकेएफ मध्ये सहभागी होण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. आशियाई सिनियर कराटे चॅम्पियनशिप आणि चौथी एकेएफ आशियाई पॅरा-कराटे चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे, या प्रतिष्ठित कार्यक्रमातून आशियातील सर्वोत्तम कराटे खेळाडूंची क्षमता, समर्पण आणि उत्साह दिसून येतो.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष भरत शर्मा, सरचिटणीस संजीव कुमार जांगरा आणि कोषाध्यक्ष मुतुम सिंग बंकिम यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय कराटे संघाने ३१ मार्च ते १ एप्रिल २०२५ दरम्यान गचीबोवली इनडोअर स्टेडियम, हैदराबाद (तेलंगणा) येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशनने २१ व्या एकेएफचे आयोजन केले आहे. आशियाई सीनियर कराटे अजिंक्यपद आणि चौथी एकेएफ आशियाई पॅरा-कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कराटे संघाच्या प्रशिक्षण आणि सहभागासाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.
या स्पर्धेत बाबी वर्मा पायादीपती, गौरव सिंधिया, प्रणय शर्मा, मनीष, अक्षय महारा, बुस्सनम, सुधीर सेहरावत, अर्का बॅनर्जी, अनिकेत गुप्ता, नवीन भिंडिया, बासू खरे, सेल्वाकुमार वेंकटेशन, नवीन, प्रतिष्ठा, अलिशा, हनी अली, भुवनेश्वर. सुरेश जाधव, नीतू मेसन सिंग, ऐशिका घोष, देबांजली कामगार, रूपकथा दत्त, तरुण शर्मा, कार्तिकेय गोयल, संजीव कुमार जांगरा (पथक प्रमुख), सल्लाउद्दीन मोहम्मद अन्सारी, महेश कुशवाह, कीर्तन कोंडरू (मुख्य प्रशिक्षक), संदीप मच्छिंद्र गाडे (प्रशिक्षक), भरत यादव (प्रशिक्षक), सावन कुमार (प्रशिक्षक), अभय कुमार (प्रशिक्षक) यांचा भारतीय पथकात समावेश आहे.