
सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर ः सोलापूर शहर शारीरिक शिक्षण आणि क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत ३० खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी सोलापूर स्पोर्ट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष महेश गादेकर हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, बेसबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद भोसले, स्पीड बॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ हत्तुरे, क्रीडा शिक्षक महासंघाचे शहर अध्यक्ष प्रा संतोष खेंडे, खजिनदार गंगाराम घोडके व सचिव सुहास छंचुरे यांची उपस्थिती होती. हा सोहळा हॉटेल सिटी पार्क येथे पार पडला.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात महेश गादेकर यांनी खेळाडू असून मैदानावर सरावासाठी इतका वेळ देऊन तुम्ही इतके चांगले गुण घेतले याबद्दल सर्व खेळाडूंचे व पालकांचे कौतुक केले. आम्ही सदैव खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहून अशी ग्वाही देखील दिली. तसेच विनोद भोसले यांनी आजपर्यंत दहावी-बारावी मधील गुणवंत खेळाडूंचा सत्कार कधी झालेला नाही आज पहिल्यांदा हा सत्कार होतोय यासाठी त्यांनी क्रीडा शिक्षक महासंघाचे कौतुक केले व खेळाडूंनी उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही पालकांची असते कारण प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला शैक्षणिक सोबत क्रीडा क्षेत्रातही खूप वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपली प्रगती करून क्रीडा क्षेत्रासोबत त्याला अभ्यासाची जोड असली पाहिजे अशी अपेक्षा वैजिनाथ हत्तुरे सर यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी महासंघाचे राज्य समन्वयक भारत इंगवले, जिल्ह्याचे संचालक विष्णू दगडे, शहर संघटनेचे कार्याध्यक्ष राजाराम शितोळे, उपाध्यक्ष वसीम शेख, अजित पाटील, सहसचिव श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, संचालक प्रबुद्ध चिंचोलीकर, विठ्ठल सरवदे, ओंकार पुजारी हे उपस्थित होते.
सत्कारमूर्ती खेळाडू
आकृती सोनकुसरे, प्रथमेश कस्तुरे, आदित्य निकते, श्रुतिका चव्हाण, ओम अंगडी, प्रणिती नागणे, स्नेहा घोडके, अथर्व खेंडे, महेश हेडे, नक्षत्र कदम, प्रज्वल माळी, प्रसाद काटकर, किरण दराडे, विजयकुमार व्हसुरे, यथार्थ पाटील, श्रवण लंबाटे, महेश तेली, समीक्षा वाघमैतर, गौतमी वाघमैतर, सलगर श्रेया, नम्रता टिमगिरे, सार्थक पोकळे, स्वरित झाडकर, गुरव अर्चित, पवित्रा चांदोडे, कामरान मोहम्मद इक्बाल दलाल.