राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावचा अंडर १४ संघ जाहीर

  • By admin
  • May 23, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

कर्णधारपदी अंश आव्हाड

जळगाव ः आंतर जिल्हा राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अंश आव्हाड याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलांची फुटबॉल स्पर्धा २५ मे पासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूलच्या मैदानावर होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा जिल्हा सचिव फारुख शेख यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्याचा फुटबॉल संघ शनिवारी शिरपूर येथे दाखल होणार आहे. या संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन सचिव फारुक शेख, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, आमिर शेख, भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, निवड समिती सदस्य नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, उदय फालक, राहील अहमद, हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, वर्षा सोनवणे व इम्रान शेख, तौसिफ शेख व वसीम शेख उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याचा फुटबॉल संघ
अंश बबन आव्हाड (कर्णधार), राशिद तारिक शेख, पार्थ चंद्रशेखर पाटील, आर्यन पंकज धावरे, शौंक ब्रिजेश लाहाटी, बिलाल वसीम शेख, चैतन्य स्वप्नील पाटील, अरहम आसिफ विच्छी, एकांश दीपक तिवारी, अर्णव नितीन पाटील, रेहान आझाद पटेल, पियुष दिवाकर भिरूड, एकांश रवींद्र ढाके, अम्मर सज्जाद शेख, शेहजाद आरिफ खा, गुफरान जोहेब सय्यद, आमेर रोहन विसाव, अथर्व गजानन पाटील.

राखीव ः अबुजार जलाल, समर सतीश चंदूध, तनुष खंबायत. प्रशिक्षक – नितीन डेव्हिड, व्यवस्थापक – वसीम शेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *