
छत्रपती संभाजीनगर ः ७१व्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पदकांची लयलूट करत ५ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य अशी १३ पदके जिंकत भारत केसरीचा किताब देखील पटकावला.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. त्यात प्रामुख्याने विश्वजीत पिसाळ (सुवर्णपदक), सूर्यकांत जाधव (पाचवा क्रमांक), अनिल वझे (कांस्यपदक), निखिल अंभोरे (कांस्यपदक), विवेक वडके (सुवर्णपदक), अनिल वझे (रौप्यपदक), विश्वजीत पिसाळ (रौप्यपदक), स्वप्नील वाघमारे (सुवर्णपदक), सूर्यकांत जाधव (रौप्यपदक), संतोष रावखंडे (पाचवा क्रमांक), विजय नवले (कांस्यपदक), अनिल वझे (किताब विजेता), निखिल अंभोरे (रौप्यपदक), सूर्यकांत जाधव (कांस्यपदक) यांनी आपापल्या प्रकारात व गटात पदकांची कमाई केली. या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग संघटनेचे कार्याध्यक्ष मोहसीन अहमद यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.