
सोलापूर ः अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धा सन २०१९ ते २०२५ अखेर या कालावधीत प्राविण्य मिळविलेल्या क्रीडापटू व कलाकारांचा गुणगौरव समारंभ राज्याचे मुख्य सचिव सुजाता सैनिक व महाराष्ट्र शासनाचे खो-खो खेळाचे मानद सचिव प्रताप माडकर यांच्या उपस्थितीत सचिवालय जिमखाना मुंबई येथे संपन्न झाला.
न्यू सोलापूर खो-खो क्लबचे राष्ट्रीय खो-खो खेळाडू प्रभाकर देवकते, सोनाली केत व सोनाली शिंदे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रभाकर देवकते हे मुंबई पोलीस आयुक्तालय आस्थापनावर, सोनाली केत भीमा विकास विभाग २ जलसंपदा विभाग सोलापूर आणि सोनाली शिंदे या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर येथे कार्यरत आहेत.
या सर्व राष्ट्रीय खो-खो खेळाडूंचे न्यू सोलापूर खो-खो क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार, सचिव प्रथमेश हिरापुरे, संतोष कदम, गोकुळ कांबळे, सुरेश भोसले व आनंद जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.