
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेचे धावपटू सुधीर कुलकर्णी, तुषार प्रधान आणि डॉ दीपक कुंकूलोळ यावर्षी दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन (९० किमी) या सर्वात जुन्या धावण्याच्या स्पर्धेसाठी जात आहेत. त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटना, टायगर रनिंग ग्रुप आणि ऑरेंज फिटनेस क्लब, तसेच विविध क्रीडापटूंच्या माध्यमातून सदरील सदिच्छा रनचे आयोजन ३ जून रोजी करण्यात आले आहे.
क्रांती चौकातील ऑगस्ट क्रांती हुतात्मा स्मारकापासून ते रेल्वे स्टेशन आणि परत असे सुमारे पाच किलोमीटर रनचे आयोजन करण्यात आले आहे. या गुडलक रनमध्ये सर्वांनी उपस्थित राहून आांतरराष्टीय स्पर्धेत सहभागी होणाऱया धावपटूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर व संघटनेचे सचिव चरणजीत सिंग संघा यांनी केले आहे.