
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आरएमएमएस सहकार्याने मुंबई-ठाणे परिसरातील १६ वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धा २८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा परेल येथे रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह गौरविण्यात येणार आहे.
शालेय कॅरम खेळाडूंची डीएसओ स्पर्धेत उत्तम कामगिरी होण्यासाठी पालकांच्या विशेष मागणीनुसार स्पर्धात्मक सामन्यांचा सराव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानिमित्त शालेय खेळाडूंना मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे. चॅम्पियन कॅरम बोर्डवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे संपर्क साधावा.