
बुलढाणा ः नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आशियाई मिक्स बॉक्सिंग गेम्स स्पर्धेसाठी चिखली येथील गणेश पेरे यांची रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय शांती खेल महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव आणि मिक्स बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणा जिल्हा सचिव गणेश पेरे यांची जानेवारी महिन्यात दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रेफ्री म्हणून निवड झाली होती. या स्पर्धेतील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांची जागतिक एशियन मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मिक्स बॉक्सिंग संस्थापक राकेश म्हसकर, महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहिते आदींनी गणेश पेरे यांचे अभिनंदन केले आहे.