
पुणे ः बॉक्सिंग या खेळाचा प्रचार व प्रसार आणि विकास व्हावा म्हणून पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे, महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी, भोर तालुका बॉक्सिंग संघटना सचिव पृथ्वीराज ओहोळ, पुणे कॅन्टोन्मेंट बॉक्सिंग संघटना सचिव असिफ शेख व इंदापूर बॉक्सिंग संघटनेचे सहसचिव ज्ञानेश्वर जगताप यांनी पळसदेव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे एल जी बनसुडे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये येथे भेट देऊन व पाहणी करून चर्चा केली. एल जी बनसुडे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा श्रीफळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. एल जी स्पोर्ट्स अकॅडमीचे कोच सतीश बनसुडे यांनी सर्वांचे आभार मानले.