जागतिक ज्युदो स्पर्धेसाठी भारतीय संघात श्रद्धा चोपडेची निवड

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटनेच्या एमआयडीसी वाळूज येथील बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील तिसगावची सुवर्णकन्या आंतरराष्ट्रीय ज्युदो खेळाडू श्रद्धा कडुबाळ चोपडे हिची जागतिक आणि विश्व अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेसाठी भारतीय ज्युदो संघात निवड झाली आहे.

श्रद्धा चोपडे हिने उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. महाराष्ट्रात खेळाचा मानाचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू हा नुकताच श्रद्धा चोपडे हिला प्रदान करण्यात आला आहे. श्रद्धा चोपडे हिची ही २८वी आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धा आहे. १३ ते २० जून २०२५ रोजी हंगेरी येथे होणाऱ्या सीनियर विश्व अजिंक्यपद ज्युदो स्पर्धेसाठी श्रद्धाची भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ स्पर्धेसाठी श्रद्धाची निवड झाली आहे व आशियाई ज्युनियर ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली आहे.

श्रद्धा चोपडे हिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्णपदक, ३ रौप्य पदक, ३ कांस्य पदक, राष्ट्रीय स्पर्धेत १० सुवर्णपदक, ७ रौप्यपदक, २ कांस्यपदक अशी शानदार कामगिरी नोंदवली आहे. सध्या भोपाळ येथील साई क्रीडा केंद्रात अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा चोपडे ही नियमित सराव करते. श्रद्धा चोपडे हिला प्रशिक्षक यशपाल सोळंकी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, मधुश्री देसाई, शैलेश कावळे, योगेश धाडवे, विजय धीमन, कडूबाळ चोपडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

या जागतिक आणि आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेसाठी भारतीय ज्युदो संघात श्रद्धा चोपडे हिची निवड झाल्याबदल महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफ‌ळे, सतीश पहाडे, योगेश धाडवे, गणेश शेटकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामनोदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, लता लोंढे, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, प्रसन्न पटवर्धन, भास्कर जाधव, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, विजय धीमन,अमित साकला, संजय परळीकर, कुणाल गायकवाड, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तु पवार, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नंदुरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, विकास देसाई, शैलेश कावळे, सागर घुगे, राज जंगमे, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटील आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *