महाराष्ट्राच्या जेमी शेखचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक 

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 

कोल्हापूर ः १४व्या राष्ट्रीय सब ज्युनियर व ज्युनियर क्लासिक पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जेमी शेख, वैष्णवी रेड्डी, रेवती, प्रतिष्ठा सिंग, इशू लाकरा यांनी सुवर्णपदक पटकावले. जेमी शेख हिने स्कॉट व डेडलिफ्ट एकूण ३७८ किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदवला. 

सब ज्युनियर गटात ६३ किलो वजन गटात तेलंगणाच्या वैष्णवी रेड्डी हिने २८२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. मध्य प्रदेशच्या तनिषा असनानी हिने २८० किलो वजन उचलून रौप्यपदक आणि राजस्थानच्या सिद्धी पांडेय हिने २७२.५ किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. 

ज्युनिअर गटात ६३ किलो वजन गटात रेवती (केरळ) हिने ३६८ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. या गटात ऐवाना मिरांडा (गोवा) हिने ३५७.५ किलो तर रिना रस्तोगी (उत्तराखंड) हिने ३५० किलो वजन उचलून अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदक संपादन केले. 

ज्युनियर गटात ६९ किलो वजन गटात ओडिशाच्या प्रतिष्ठा सिंग हिने ४०२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. पश्चिम बंगालच्या मामुदा खातून हिने ३९० किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. उत्तर प्रदेशची प्रतिमा चौधरी हिने कांस्यपदक मिळवले.

सब ज्युनियर गटात ६९ किलो वजन प्रकारात हरियाणाच्या इशू लाकराने ३३७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. पश्चिम बंगालच्या मुस्कान राऊतने ३१७.५ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या संदीपा विश्वकर्माने २९७.५ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले.

सब ज्युनियर महिला गटात ७६ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या जेमी शेख हिने ३७० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. चंद्रलेखा (केरळ) हिने ३२७.५ किलो वजन उचलून रौप्यपदक तर हरलीन सोनी (हिमाचल प्रदेश) हिने २९२.५ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. 

सब ज्युनियर पुरुष गटात ९३ किलो वजन गटात हिमांशू यादव (६७२.५ किलो), राजाभैय्या (६०७.५ किलो) आणि सूर्यप्रताप सिंग (५९७.५ किलो) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकली आहेत. 

ज्युनियर पुरुष गटात ९३ किलो वजन गटात हरियाणाच्या पार्थ मेहता याने ७४६.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. आसामच्या रिषभ घोष याने ७३८ किलो तर राजस्थानच्या उमेश कुमार बनकर याने ६८२.५ किलो वजन उचलून अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदक पटकावले. 

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *