आयसीआयसीआय बँक आणि सिटीबँक एनए संयुक्तपणे प्लेट ग्रुप विजेते

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मुंबई : आयसीआयसीआय बँक आणि सिटीबँक एनए संघांना ६३ व्या सर बेनेगल रामा राव आरबीआय शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट ग्रुपमधील संयुक्त विजेते घोषित करण्यात केले.

रात्रभर झालेल्या पावसामुळे खेळपट्टी आणि मैदान खेळण्यायोग्य नसल्याने पी जे हिंदू जिमखाना मैदानावर होणारा सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यातील प्लेट ग्रुपचा अंतिम सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात आले.

आरबीआयचे मुख्य व्यवस्थापक संदीप कुमार त्यांच्या हस्ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना आरबीआय बँक क्रिकेट ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी एमसीएचे सचिव अभय हडप आणि आरबीआयचे समिती सदस्य देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *