
जयपूर ः मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने शानदार कामगिरी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीने त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडला. तो एका हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
पंजाब किंग्ज विरुद्धच्या आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याने चमकदार कामगिरी केली. त्याने चालू हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक ३४ चेंडूत पूर्ण केले आणि ५७ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने ३९ चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार आणि दोन षटकार मारले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३७ धावा काढताच महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा १५ वर्षे जुना विक्रम मोडला. तो आयपीएलच्या एकाच हंगामात या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ६०० धावांचा टप्पा गाठला.
सूर्याने विश्वविक्रम केला
सूर्यकुमार यादवने १४ डावांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करून मोठी कामगिरी केली. त्याने १४ डावांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला. या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला मागे टाकले, ज्याने १३ वेळा २५ पेक्षा जास्त धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (आयपीएल हंगाम)
सूर्यकुमार यादव ६४० (२०२५)
सचिन तेंडुलकर ६१८ (२०१०)
सूर्यकुमार यादव ६०५ (२०२३)
सचिन तेंडुलकर ५५३ (२०११)
लेंडल सिमन्स ५४० (२०१५)
रोहित शर्मा ५३८ (२०१३)