
जयपूर ः आयपीएल स्पर्धेचा अखेरचा लीग सामना खेळताना मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने खास ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. ही कामगिरी त्याने केवळ टी २० क्रिकेटमध्ये नोंदवली आहे हे विशेष.
३०० वा सामना
पंजाब किंग्ज संघाविरुद्ध सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने खास त्रिशतक पूर्ण केले. हा त्याचा टी २० क्रिकेटमधील ३०० वा सामना होता. हार्दिक त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या ३०० व्या टी २० सामन्यात त्याने १५ चेंडूत २६ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
५००० पेक्षा जास्त धावा
हार्दिक पांड्याने आतापर्यंत ३०० टी २० क्रिकेट सामन्यांमध्ये ५५३८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून २१ अर्धशतके झाली आहेत. तो १० वेळा शून्यावर बाद झाला आहे. जर तो त्याच्या लयीत असेल तर तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला उध्वस्त करू शकतो.
गुजरात टायटन्स संघाला चॅम्पियन बनवले
याशिवाय, हा त्याचा आयपीएलमधील १५० वा सामना आहे. त्याने १५० आयपीएल सामन्यांमध्ये एकूण २७१२ धावा केल्या आहेत, ज्यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने ७७ विकेट्सही घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. त्याने एकट्याने गुजरातला आयपीएल २०२२ चे विजेतेपद मिळवून दिले.