बुद्धिबळ स्पर्धेत सक्षम चेस अकॅडमीचे घवघवीत यश 

  • By admin
  • May 27, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

दिनकर हंबर्डे यांची चमकदार कामगिरी 

नांदेड ः आर्यन्स एंटरप्रायझेस आयोजित भारतबाई हलकुडे स्मरणार्थ बुद्धिबळ महोत्सवात नांदेडच्या सक्षम चेस अकादमी खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच शौर्य मुप्पानेनी व दिनकर हंबर्डे यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 

या बुद्धिबळ महोत्सवात चार प्रकारच्या म्हणजे ओपन गट, बिलो १८००, रॅपिड रेटिंग आणि ब्लिट्झ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाला डॉ नवले, राजेंद्र कोंडे व केतन खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये २१५४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त १५६७ खेळाडूंचा सहभाग होता,

रॅपिड प्रकारात व्हिक्टोरियस चेस अकॅडमी पुणे संघाने प्रथम, कला क्रीडा प्रबोधिनी पुणे संघ द्वितीय आणि सक्षम चेस अकॅडमी नांदेड तृतीय असे घवघवीत यश संपादन केले. शौर्य आदित्य मुप्पानेनी याने क्लासिक व ब्लिट्झ या प्रकारामध्ये नऊ वर्षांखालील खेळाडूंमध्ये मेडल प्राप्त केले तर डॉ दिनकर हंबर्डे यांनी बिलो १६०० प्रकारात चतुर्थ क्रमांक प्राप्त करत ३ हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक प्राप्त केले. प्रकाश कुंटे, राजेंद्र कोंडे व नितीन शेणवी यांच्या हस्ते दिनकर हंबर्डे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *