
गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलने पटकावली फर्स्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी
धाराशिव ः दिल्ली येथे आयोजित दुसरी नॅशनल इनडोअर मार्शल आर्ट गेम्स आणि पहिली लाठी फेडरेशन कप स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील खेऑळाडूंनी लाठी व दांडपट्टा या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले. मुरुमच्या गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलने फर्स्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली.
या स्पर्धेत विविध राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या खेळाडूंनी लाठी व दांडपट्टा या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले. गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी देवांश चिलोबा याने एकम लाठी व द्वे लाठी या खेळ प्रकारात १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक व दांडपट्टा मुक्त शैली या क्रीडा प्रकारात १ सुवर्णपदक जिंकून लक्षवेधून घेतले.
१० वर्षांखालील गटात मोरया गौतम विधाते याने २ सुवर्ण पदक, राजवीर बळीराम चौधरी याने एकम लाठी २ कांस्य पदक, दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, समर्थ सुनील बायस याने एकम लाठी १ रौप्य पदक, कांस्यपदक व द्वे लाठी कांस्यपदक या प्रकारात आपला ठसा उमटवला.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात गणेश विकास पाटील याने एकम लाठी सुवर्णपदक व कांस्यपदक, नवाज चांदपाशा मुर्शिद याने एकम लाठी रौप्य पदक, आर्यन व्यंकट जाधव याने द्वे लाठी सुवर्ण पदक, कांस्यपदक व फेडरेशन कप रौप्य पदक पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रेयस धर्मेंद्र मोरे याने एकम लाठी कांस्यपदक फेडरेशन कप, आयुष युवराज पवार याने एकम लाठी १ सुवर्णपदक, फेडरेशन कप कांस्यपदक व दांडपट्टा मुक्त शैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, अनुज विक्रम सूर्यवंशी याने एकम लाठी २ सुवर्ण पदक व दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
१६ वर्षांखालील मुलांच्या गटात साहिल महंमद रफी शेख याने एकम लाठी, द्वे लाठी प्रकारात सुवर्ण पदक व रौप्यपदक व दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. १८ वर्षांखालील गटात शिवशंकर शंकर आगलावे याने लाठी क्रीडा प्रकार काठपवित्रा महरुम २ कांस्यपदक, आयान महंमद रफी शेख दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्तशैली सुवर्णपदक पटकावले.
८ वर्षांखालील मुलींच्या गटात आरोही बलभीम पटवारी हिने द्वे लाठी रौप्य पदक, आराध्या संतोष शेटगार हिने एकम लाठी सुवर्णपदक व रौप्य पदक, लाव्या नागनाथ वाघमारे हिने एकम लाठी सुवर्ण पदक व दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्त शैली सुवर्णपदक, प्रत्युषा प्रवीण सोमवंशी हिने द्वे लाठी कांस्यपदक पटकावले.
१२ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा विलास पाटील हिने एकम लाठी कांस्यपदक. आराध्या प्रभाकर जाधव हिने द्वे लाठी सुवर्णपदक व दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्त शैली सुवर्णपदक, ईश्वरी राहुल चिलोबा हिने दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्त शैली सुवर्णपदक पटकावले.
१६ वर्षांखालील मुलींच्या गटात लाठी क्रीडा प्रकार पंचआनिक अनन्या मारुती पांगे, श्रेया जितेंद्र अंकुशे, ईश्वरी प्रकाश माने, अफसाना लाडले मशाक नदाफ, श्रेयशी त्रिमूर्ती शिंदे यांनी २ सुवर्णपदक जिंकले. भाग्यश्री केदारनाथ पवार हिने लाठी कटपवित्र सुवर्ण पदक व द्वे लाठी कांस्यपदक, श्रुती विनोद जाधव हिने एकम व द्वे लाठी सुवर्णपदक जिंकले.
या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र मार्शल आर्ट्स गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव व दिल्ली ऑलिम्पिकचे सहसचिव दीपक अग्रवाल, लाठी इंटरनॅशनलचे फाउंडर सुभाष मोहिते, लाठी इंडियाचे अध्यक्ष अजय शहा यांच्या उपस्थितीत मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
गुरुकुल इंग्लिश स्कूलचे सचिव आनंद चौधरी, जिल्हा परिषद उमरगा शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, रामानुजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष महेश अंबर, धाराशिव जिल्हा लाठी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल पाटील व सर्व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा दांडपट्टा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रीती चिलोबा, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका मयुरी चौधरी, टीम कोच गौतम विधाते, टीम मॅनेजर आदिनाथ गोरे, ऑफिशियल वजीर शेख, धनराज तेलंग, लाठी इंडियाचे डायरेक्टर महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले.