राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

  • By admin
  • May 27, 2025
  • 0
  • 42 Views
Spread the love

भंडारा : राष्ट्रीय सब ज्युनियर नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सत्यम बाभरे व वैष्णवी गायकवाड यांची कर्णधार म्हणून निवड  करण्यात आली आहे. 

भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमधून निवड समिती सदस्य डॉ दिलीप जयस्वाल (चेअरमेन), श्याम देशमुख (संयोजक), समीर सिकीलकर, महेशकुमार काळदाते, शिवानी सांब्रेकर यांनी दोन्ही संघ जाहीर केले.
भंडारा येथील प्रोगेसिव्ह इंग्लिश स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व परीक्षा शिबीर घेण्यात आले. 

महाराष्ट्राचा मुलांचा संघ 

सत्यम बाभरे (कर्णधार), सोहम माळी (उपकर्णधार), अनमोल जाधव, मोहित वाघ, अभिषेक दराडे, अर्णव गाणार, अर्णव निनावे, सोहम गायधने, पारस रोडगे, सार्थक पवार. प्रशिक्षक – हर्षल निनावे, व्यवस्थापक – झंकृत पंचभाई.

मुलींचा संघ : वैष्णवी गायकवाड (कर्णधार), उन्नती बालपांडे (उपकर्णधार), समृद्धी पवार, आराध्या दराडे, सृष्टी तिवारी, रुची वरखडे, काव्या टेकाम, दुर्वा कळंबे, प्राप्ती धुर्वे, नव्या गलबले. प्रशिक्षक – प्रिन्स उपरीकर, व्यवस्थापक – धनश्री कावळे.
                    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *