महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी गणेश बेटूदे 

  • By admin
  • May 27, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन आणि चंदीगड सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  २९ मे ते २ जून २०२५ या कालावधीत पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड येथे आयोजित ४३व्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ज्युनिअर संघास पदक प्राप्त झालेले आहे, असे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा गणेश बेटूदे यांची महाराष्ट्र राज्य मुलांच्या संघ प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.        

या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, दीपक रुईकर, राकेश खैरनार, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, संतोष आवचार, प्रवीण शिंदे, सचिन बोर्डे, भीमा मोरे, अजित झा, रफिक जमादार, स्वप्निल गुडेकर आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *