मुंबई ः हरियाणातील पालीवाल येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल एसएआय एनसीओई मुंबईची कुस्तीपटू आयुष्का गाडेकरचे अभिनंदन करण्यात आले. एसएआय आरसी मुंबईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (आयआरएस) यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.