
छत्रपती संभाजीनगर ः लायन्स क्लब सेन्ट्रल व छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रॅपिड व ब्लिट्झ जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष गढिया आणि अनुप कापडिया यांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुहास किंडरगर्टेन येथे थाटात पार पडला. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. छत्रपती संभाजीनगरातील अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त राष्ट्रीय विजेता, राज्य विजेते खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे चुरशीच्या लढती झाल्या.
जिल्हा रॅपिड व ब्लिट्झ् निवड बुद्धिबळ चाचणी स्पर्धेचा बक्षीस समारंभ जल्लोषात साजरा करण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिके व द फिटनेस शॉपीतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्यास लायन्स क्लब सेन्ट्रलचे अध्यक्ष संतोष गांधी, प्रोजेक्ट चेअरमन राहुल संचेती, कोषाध्यक्ष जयेश सुराणा, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, नमिता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य पंच विलास राजपूत, सोनाली जाधव, श्रीराम इंगे, मधुर तामणे, प्रतिभा निकम यांनी पुढाकार घेतला होता. या दोन प्रकारच्या निवड स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड पालघर येथे आयोजित राज्य रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत करण्यात आली. रॅपिड स्पर्धा व ब्लिट्झ स्पर्धेतील विजेत्यांना एकूण अकरा हजार रूपयांची रोख पुरस्कार प्रदान करण्यात आली.
अंतिम निकाल
रॅपिड स्पर्धा ः १. हर्ष गढिया, २. वैभव लोखंडे, ३. श्रुती काळे, ४. अनुप कापडिया, ५. आशिष संकलेचा, ६. सारंग कुलकर्णी, ७. ओम नागरे, ८. अर्णव तोतला, ९. अनिकेत जोशी, १०. अर्चित बागला.
ब्लिट्झ स्पर्धा : १. अनुप कापडिया, २. लेख मिठावाला, ३. श्रुती काळे, ४. वैभव लोखंडे, ५. स्वराज विश्वासे.
रॅपिड स्पर्धेतील १३ वर्षांखालील विजेते ः मुले – १. स्वराज विश्वासे, २. अनिकेत पल्हाळ. मुली – १. समृद्धी काळे, २. उन्मेषा मानुरकर.
नऊ वर्ष वयोगटातील विजेते ः मुले – १. उत्कर्ष पांचाळ, २. श्रेयस मुळे. नऊ वर्षांखालील विजेती :- संस्कृती गोलेगावकर.