
पुणे ः इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांच्यामार्फत आयोजित परिवर्तन प्रिझन टू प्राइड या उपक्रमांतर्गत फिडे या जागतिक बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित आशियाई आंतरकारागृह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यानी रौप्य पदक मिळविले तसेच ऑक्टोबर २०२५ मध्ये होणाऱ्या जागतिक आंतरकारागृह ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पटकावला.
यापूर्वी देखील जागतिक आंतर कारागृह ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृह बंदी संघाने सन २०२२ मध्ये कांस्य पदक व सन २०२३ मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. विजेता संघाचे येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील एन ढमाळ यांनी सहभागी बंद्यांचे अभिनंदन व कौतुक केले तसेच जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कारागृहातील स्पर्धक बंद्यांना ग्रँडमास्टर अभिजित कुंटे व ईशा करवडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे यांचेमार्फत परिवर्तन – प्रिझन टू प्राइड हा उपक्रम डॉ सुहास वारके अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ जालिंदर सुपेकर विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी अधीक्षक सुनील ढमाळ, पी पी कदम, डॉ भाईदास ढोले, आर ई गायकवाड, ए एस कांदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी व इंडियन ऑइल लिमिटेड यांच्याकडील केतन खैरे, सागर मोहिते, पवन कातवडे, योगेश परदेशी यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.