
सिंगापूर ः दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे.
मंगळवारी सिंधूने कॅनडाच्या वेन यू झांगला पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधूने फक्त ३१ मिनिटे चाललेल्या सामन्यात झांगचा २१-१४, २१-९ असा पराभव केला. तथापि, सिंधूसाठी पुढचा मार्ग कठीण आहे कारण आता तिचा सामना टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि सध्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेली चीनची यू फी हिच्याशी होईल.
सिंधूने विजयी सुरुवात केली असली तरी इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होती. मालविका बन्सोड, अनमोल खरब, प्रियांशू राजावत आणि किरण जोर्ड आपापले सामने गमावले आणि पहिल्या फेरीत बाहेर पडले. एका गेमची आघाडी घेऊनही मालविका आणि प्रियांशुला गती राखता आली नाही.