राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या १८ खेळाडूंचा सहभाग

  • By admin
  • May 28, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

मुंबई ः देहरादून येथे २९ मे पासून सुरू होणाऱ्या चौथ्या कॅडेट आणि ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबई संघाचे १८ खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई संघटनेचे अध्यक्ष आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त भास्कर करकेरा यांनी दिली.

ही तायक्वांदो स्पर्धा उत्तराखंडमधील मल्टीपर्पज हॉल, परेड ग्राउंड, देहरादून येथे कॅडेट आणि ज्युनिअर गटात होणार आहे. क्युरोगी व पुमसे या प्रकारात ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामध्ये जवळपास १६०० मुले व मुली, पदाधिकारी, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक सहभागी होणार आहेत. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले मुंबई खेळाडू

विघ्नेश गोट्टीमुकुल्ला, वीर वायाळ, अक्षरा शानभाग, काव्या धोदाय्यानोर, कियान देसाई, विधी बुधे, रुद्र खंदारे, शिवानी तेली, ध्रुव तंबाके, उर्वी चव्हाण, शार्दूल शेंद्रे, गौरव नागवेकर, अथर्व सावंत, मंजिरी तळगावकर, रिया बनिया. प्रशिक्षक : सिद्धेश घाग, प्रेमकुमार श्रेष्ठ, संघ व्यवस्थापक : स्वाती गोट्टीमुकुल्ला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *