
विक्टोरियस चेस अकॅडमी आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे ः पुण्यातील बुद्धिबळप्रेमींसाठी पुन्हा एक आनंदाची संधी! विक्टोरियस चेस अकॅडमी (व्हीसीए) आणि रिलायन्स मॉल, एरंडवणे यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जून रोजी रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिरीजचा दुसरा टप्पा १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा खेळाडूंची कौशल्य, रणनीती आणि सातत्य यांची कसोटी पाहणारी आहे.
पहिली स्पर्धा १३ एप्रिल २०२५ रोजी झाली होती आणि ती स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली आणि सर्व वयोगटांतील खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या यशाने पुढील टप्प्यांसाठी उत्साह व अपेक्षा दोन्ही वाढवल्या आहेत. भव्य पारितोषिके, सुंदर ट्रॉफी व मेडल्ससह ही स्पर्धा प्रत्येक स्तरावरील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ देईल जिथे ते स्पर्धात्मक वातावरणात खेळू शकतील, शिकतील आणि प्रगती करतील.
रिलायन्स मॉल, एरंडवणे हे या स्पर्धेचे अधिकृत स्थळ असून खेळाडूंना आणि पालकांना आरामदायी, प्रशस्त आणि प्रेरणादायी वातावरण प्रदान करते, जे स्पर्धेच्या यशात मोलाची भर घालते. १ जून रोजी होणाऱया रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत २० हजार रुपयांची रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी व मेडल्स दिले जाणार आहेत. नोंदणी व अधिक माहितीसाठी 8626025502 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या सहा भागांच्या बुद्धिबळ सिरीजमधील दुसऱ्या रोमांचक टप्प्याचा हिस्सा व्हा आणि प्रत्येक रविवारी बुद्धिबळाचा आनंद अनुभवा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.