भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेटिनावर विजय 

  • By admin
  • May 28, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

नवी दिल्ली ः भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने चार देशांच्या स्पर्धेत यजमान अर्जेंटिनावर रोमांचक विजय मिळवला. गोलकीपर आणि कर्णधार निधीने भारतासाठी सलग चार गोल वाचवले. त्यामुळे भारतीय संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाला २-० ने हरवले. तत्पूर्वी, दोन्ही संघांमधील सामना निर्धारित वेळेपर्यंत १-१ असा बरोबरीत संपला.

कनिका हिने ४४व्या मिनिटाला निर्धारित वेळेत भारतासाठी एकमेव गोल केला, तर लालरिनपुई आणि लालथंतुआंगी यांनी शूटआउटमध्ये गोल करून भारताला स्पर्धेतील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. अर्जेंटिनाने चांगली सुरुवात केली. मिलाग्रोस डेल व्हॅले हिने १०व्या मिनिटाला पहिल्या क्वार्टरमध्ये यजमान संघाला आघाडी मिळवून दिली होती. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये कनिकाच्या गोलने बरोबरी साधली. भारताचा पुढील सामना शुक्रवारी चिलीशी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *