जसविंदरसिंग रामगडिया अध्यक्षपदी, सचिवपदी राहुल वाघमारे

  • By admin
  • May 28, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱयांची निवड

नांदेड (जयपाल रेड्डी) ः नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी जसविंदरसिंग अवतार सिंग रामगडिया यांची तर सचिवपदी डॉ राहुल वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.

नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (२८ मे) झाली. या सर्वसाधारण सभेत नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सरदार जसविंदर सिंग अवतार सिंग रामगडिया यांची अध्यक्षपदी निवड झाली. डॉ राहुल वाघमारे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

ऑलम्पिक असोसिएशन नांदेडतर्फे वर्षभरात विविध अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिव डॉ राहुल वाघमारे यांनी सांगितले. २३ ते २९ जून या कालावधी ऑलिम्पिक सप्ताह तसेच गुणवंत क्रीडा पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. संघटनेचे माजी सचिव बालाजी जोगदंड, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी विनोद गोस्वामी, रामन बैनवाड, डॉ राजेश जांभळे, विनोद जमदाडे, डॉ दिनकर हंबर्डे, डॉ भीमसिंग मुनीम, डॉ कळमसे अशी क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *