< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); गतविजेत्या अल्काराझचा विजयासाठी संघर्ष – Sport Splus

गतविजेत्या अल्काराझचा विजयासाठी संघर्ष

  • By admin
  • May 29, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

फ्रेंच ओपन ः सबालेंका-स्विटेकची आगेकूच 

पॅरिस ः फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत गतविजेत्या कार्लोस अल्काराज याला विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. महिला गटात सबालेंका, स्विटेक यांनी तिसरी फेरी गाठली आहे. 

फ्रेंच ओपन टेनिसच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या गतविजेत्या कार्लोस अल्काराजला विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने हंगेरीच्या फॅबियन मारोझनचा ६-१, ४-६, ६-१, ६-२ असा पराभव केला. मारोझनने यापूर्वी एकदा अल्काराजचा पराभव केला आहे. दोनदा फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या सातव्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडची मोहीम दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आली. तो पोर्तुगालच्या नुनो बोर्गेसकडून ६-२, ४-६, १-६, ०-६ असा पराभव पत्करला.

चार वेळा फ्रेंच ओपन विजेती पोलंडची पाचवी मानांकित इगा स्विटेकने इंग्लंडच्या एम्मा रादुकानुचा ६-१, ६-२ असा पराभव केला. बेलारूसच्या अव्वल मानांकित आर्यना साबालेंकाने जिल तेचमनचा ६-३, ६-१ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या इटलीच्या पौलिनीने ऑस्ट्रेलियाच्या टॉमलजानोविचचा ६-३, ६-३ असा पराभव केला.

पॅरिस ऑलिंपिक विजेत्या झेंगची आगेकूच
पॅरिस ऑलिंपिक विजेत्या चीनच्या आठव्या मानांकित झेंग किनवेनने एमिलियाना अरांगोचा ६-२, ६-३ असा पराभव केला. इटलीच्या मॅटेओ गिगांटेने २० व्या मानांकित ग्रीसच्या त्सित्सिपासचा ६-४, ५-७, ६-२, ६-४ असा पराभव करून निराशा निर्माण केली. जोआओ फोन्सेकाने पहिल्या फेरीत ३० व्या मानांकित हुर्काझचा ६-२, ६-४, ६-२ असा पराभव केला.

बोपन्ना, युकी आणि बालाजीची आगेकूच
भारताचा ४५ वर्षीय रोहन बोपन्ना आणि चेक प्रजासत्ताकचा अ‍ॅडम पावलासेक यांनी अमेरिकेचे रॉबर्ट कॅश आणि जेम्स ट्रेसी यांचा ७-६, ५-७, ६-१ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. युकी भांबरी आणि अमेरिकेच्या रॉबर्ट गॅलोवे यांनी नेदरलँडच्या रॉबिन हास आणि जर्मनीच्या हेंड्रिक जेबेन्स यांचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव केला. श्रीराम बालाजी आणि मिगुएल वारेला यांनी कॅमिलो उगो आणि बू युनचाओकेटे यांचा ६-२, ६-१ असा पराभव केला. रित्विक बोलीपल्ली आणि बॅरिएंटोस यांना गॅब्रिएल डायलो आणि फर्नले यांच्याकडून ०-६, २-६ असा पराभव पत्करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *