खेलो इंडिया तलवाराबाजी स्पर्धेत दमाणी प्रशालेच्या दोघांना सुवर्ण

  • By admin
  • May 29, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

सोलापूर ः राजगीर (बिहार) येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत तलवारबाजी प्रकारात येथील बी एफ दमाणी प्रशालेच्या आदित्य निकते व प्रथमेश कस्तुरे यांनी सुवर्ण पदक पटकाविले. त्यांनी ईपी या सांघिक प्रकारात ही कामगिरी केली.

सोलापूर शहरातून या स्पर्धेसाठी या दोघांचीच निवड झाली होती. त्यांना प्रशिक्षक पवन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. भोसले यांची महाराष्ट्राच्या तलवारबाजी संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड झाली होती. विशेष कौतुकाची बाब म्हणजे निकते याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले आहेत.

संस्थेच्या वतीने पुढील सरावासाठी स्कॉड देऊन दोन्ही खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य गिरिधारी भुतडा, स्थानीय अध्यक्ष कालिदास जाजू, सचिव मंगल काबरा, सहसचिव उज्वल तापडिया, मुख्याध्यापिका रेखा पेंबर्ती, पर्यवेक्षक राहुल इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *