क्रीडा शिक्षक किशोर नावकर, सूरज सुलाने माउंट किलीमांजारो शिखर मोहिमेसाठी रवाना

  • By admin
  • May 29, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना येथील क्रीडा शिक्षक आणि प्रसिद्ध गिर्यारोहक किशोर नावकर आणि श्री सरस्वती भुवन प्रशाला छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा शिक्षक सूरज सुलाने हे दोघेही प्रसिद्ध गिर्यारोहक जागतिक सेवन समिट यापैकी आफ्रिका खंडातील माउंट किलीमंजारो ५८९५ मीटर (१९३४० फूट) हे शिखर सर करण्याकरिता ४ जून २०२५ रोजी सकाळी रवाना होणार आहेत.

किशोर नावकर आणि सूरज सुलाने यांना इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, ३६० एक्सप्लोररचे एव्हरेस्टवीर डॉ आनंद बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गिर्यारोहण मोहीम ही ३६० एक्सप्लोररमार्फत आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेच्या फ्लॅग ऑफ कार्यक्रमप्रसंगी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड दिनेश वकील, सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे, कोषाध्यक्ष मिलिंद रानडे, सहचिटणीस डॉ सुनील देशपांडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी मोहिमेसाठी व दोनही क्रीडा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *