मुंबई ः महाराष्ट्र राज्य सिनियर, सब ज्युनिअर, ज्युनिअर, मास्टर्स १, २, ३, ४ इक्वीपड पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा पालघर येथे ३१ मे आणि १ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा रोटरी क्लब पालघर यांच्या सहकार्याने, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व व पालघर जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने लायन्स क्लब हाॅल, रस्सम हाॅटेल समोर, कचेरी रोड, पाच बत्ती जवळ, पालघर – ४०१४०४ येथे होतील. पालघर स्टेशन पासून ५ मिनिटांच्या अंतरावर स्पर्धा ठिकाण आहे.
या राज्य स्पर्धेतून २२ ते ३० जून २०२५ या कालावधीत दावणगिरी-कर्नाटक या ठिकाणी होणाऱ्या वरिष्ठ, सब ज्युनियर, ज्युनिअर राष्ट्रीय (पुरुष व महिला) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक सुजित सिंग (9923245698), रवी गायकर (9594384747), प्रकाश गजरा (9822979157) यांच्याशी संपर्क करावा. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे सरचिटणीस आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी केले आहे.