
जळगाव ः राज्यस्तरीय हॉकी निवड चाचणीसाठी रीतिमा बारेला आणि रशीला बारेला या दोन खेळाडूंची जळगाव जिल्हा हॉकी संघटनेतर्फे निवड करण्यात आली आहे.
१५ वी हॉकी इंडिया सब ज्युनिअर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा ३ ते १४ जुलै रोजी रांची येथे होत आहे. या स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्रतर्फे महाराष्ट्र राज्याचा संघ पुणे येथे निवडला जाणार आहे. या निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील १५ वर्षांखालील दोन उत्कृष्ट खेळाडूंची निवड श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आली व त्यांना निरोप देण्यात आला.
दोन्ही खेळाडूंना महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्ष डॉ अनिता कोल्हे यांच्यातर्फे हॉकी स्टिक देऊन गौरविण्यात आले. तसेच हॉकी जळगावतर्फे फारूक शेख यांनी आवश्यक त्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. यावेळी हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, संचालिका वर्षा सोनवणे व पोलीस दलाची राष्ट्रीय खेळाडू किरण भिसे यांची उपस्थिती होती.
निवड झालेले खेळाडू रितिमा पंचनाल बारेला आणि रशीला बन्सीलाल बारेला या चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील शासकीय आश्रम शाळा (जि. जळगाव) या ठिकाणी शिकत आहेत.