
हिंगोली ः हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली शहरामध्ये १५ दिवसीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा नुकताच समारोप झाला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एकता स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली गजानन आडे, जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या कर्मचारी मुकाडे व सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. या शिबिरामध्ये मुलांना ॲथलेटिक्स
या शिबिरातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ, पौष्टिक आहार त्यामध्ये ब्रेड जाम, मटकी, अंडी, उपमा, पोहे, ऑम्लेट व फळांमध्ये सफरचंद, केळी, टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी असा आहार देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र व कधी कधी टीव्ही द्वारे विद्यार्थ्यांना खेळाविषयी बातम्या, व्हिडिओ व वेगवेगळी माहिती टीव्हीद्वारे त्यांना दाखवण्यात आली. जेवणातही चांगले मेनू होते. त्यात वरण-भात, बटाटा, टोमॅटो, शेवगा, सोयाबीन वडी, पनीर, वांगी, चपाती, सलाड, स्वीटमध्ये जिलेबी, शिरा, गुलाब जामुन, बालुशाही असे पदार्थ देण्यात आले.
शिबीर दरम्यान विद्यार्थ्यांना वेळोवेळी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, पौष्टिक कडधान्याची माहिती, एक पेड मा के नाम, स्वच्छता ही सेवा असे वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी टूर विजिटचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ येथील मंदिरास भेट दिली व तिथे असलेल्या नागनाथ उद्यान हिला सुद्धा भेट देऊन विद्यार्थ्यांनी मंदिरात व उद्यानात स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत मंदिराची उद्यानाची पूर्ण स्वच्छता केली. उद्यानामध्ये निसर्गमय वातावरणात विद्यार्थ्यांनी खूप मनोरंजन व तिथे असलेल्या सिसो, घसरगुंडी, झोका खेळून तेथील पुरातन वास्तूंची माहिती घेऊन परत कॅम कडे रवाना झाले. कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांविषयी माहिती देऊन, वेगवेगळ्या स्पर्धा ठेवून विजेते खेळाडूंना मेडल देण्यात आले व खूप आनंदमय वातावरणात हा कॅम्प समाप्त झाला. या शिबिरात ८० ते १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
शिबीर समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना टी-शर्ट, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर, युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार, क्रीडा अधिकारी बोथीकर, क्रीडा अधिकारी कोंडेकर, निळकंठ श्रावण, खुणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बंकट यादव, अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकता स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सचिव गजानन आडे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच एकता स्पोर्ट्स फाउंडेशनचे सहकारी प्रकाश अडकिने, विशाल कदम, दीपाली आडे, समृद्धी कदम, बजरंग कदम, वंश कोंडाणे, करण भिसे, नागेश ढोकर, लक्ष्मण राठोड या सर्व प्रशिक्षकाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच २ ते ८ जून या कालावधीत द्वितीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पसाठी हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. नोंदणीसाठी गजानन आडे (9325342205) यांच्याशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे.