फिल सॉल्टने रचला नवा इतिहास, आरसीबी संघाचा पहिला फलंदाज

  • By admin
  • May 30, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

चंदीगड ः आरसीबी संघाचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्ट याने आक्रमक नाबाद अर्धशतक ठोकून एक नवा इतिहास रचला आहे. अशा पराक्रम करणारा सॉल्ट हा पहिला आरसीबी संघाचा फलंदाज ठरला आहे. तसेच आयपीएल इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला.

पहिला क्वालिफायर सामन्यात आरसीबी संघाने १० षटके शिल्लक असताना आठ विकेट्सने विजय मिळवला. सामन्यादरम्यान लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीचा सलामीवीर फिल सॉल्ट पुन्हा एकदा उत्तम फॉर्ममध्ये होता. त्याने डावाची सुरुवात करताना एकूण २७ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने २०७.४१ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ५६ धावा केल्या. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन उत्कृष्ट षटकार निघाले.

फिल सॉल्टने मोठी कामगिरी केली
क्वालिफायर-१ सामन्यात शानदार फलंदाजी करताना २८ वर्षीय फिल सॉल्ट याने दमदार कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये १००० धावा करणारा तिसरा सर्वात जलद खेळाडू ठरला आहे, तर तो आरसीबीचा पहिला खेळाडू बनला आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने फक्त ५४५ चेंडूत १००० धावांचा टप्पा गाठला होता.

रसेलनंतर ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५७५ चेंडूत आयपीएलमध्ये पहिले १००० धावा पूर्ण केल्या होत्या. आता फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानावर आला आहे. इंग्लिश फलंदाजाने ५७६ चेंडूत १००० आयपीएल धावांचा टप्पा गाठला आहे, तो हेडपेक्षा एक चेंडू जास्त खेळला आहे.

या तीन दिग्गजांनंतर, आफ्रिकन यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनचे नाव चौथ्या स्थानावर आहे. क्लासेनने ५९४ चेंडूत आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण केला होता. त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवाग पाचव्या स्थानावर आहे. त्याने ६०४ चेंडूत ही महान कामगिरी केली होती.

फिल सॉल्टची आयपीएल कारकीर्द
फिल सॉल्टच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ३३ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटने ३३ डावांमध्ये ३४.६७ च्या सरासरीने १०४० धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १० अर्धशतके आहेत. त्याने १७५.६८ च्या स्ट्राइक रेटने हे धावा केल्या आहेत.

सर्वात कमी चेंडूत १००० आयपीएल धावा करणारे खेळाडू

५४५ धावा – आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)
५७५ धावा – ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया)
५७६ धावा – फिल सॉल्ट (इंग्लंड)
५९४ धावा – हेनरिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका)
६०४ धावा – वीरेंद्र सेहवाग (भारत)
६१० धावा – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *