
चंदीगड ः आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप जिंकण्याची लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या शर्यतीत साई सुदर्शन याने मोठी आघाडी घेतली आहे. सुदर्शन याने ७५९ धावा फटकावत ऑरेंज कॅपवर आपला दावा मजबूत केला आहे. सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर असून त्याने ६७३ धावा काढल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आयपीएलमध्ये फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. साई सुदर्शन, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी चालू हंगामात शानदार कामगिरी केली आहे.
साई सुदर्शनच्या सर्वाधिक धावा
गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत १५ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ७५९ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि ६ अर्धशतके केली आहेत. तो गुजरात टायटन्ससाठी सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्याने स्वतःच्या बळावर संघाला प्लेऑफमध्ये नेले आहे. सध्या तो ऑरेंज कॅप धारण करत आहे.
आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने चालू हंगामात आतापर्यंत ६७३ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ६५० धावा केल्या आहेत.
विराट कोहली पाचव्या क्रमांकावर
लखनऊ सुपर जायंट्स संघ बाहेर पडला आहे, परंतु त्याचा फलंदाज मिचेल मार्श चालू हंगामात सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ६२७ धावा केल्या आहेत. सुपर स्टार फलंदाज विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने चालू हंगामात एकूण ६१४ धावा केल्या आहेत.
पाच फलंदाजांनी ६०० प्लस धावा केल्या आहेत
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण पाच फलंदाजांनी ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये साई सुदर्शन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि मिचेल मार्श यांचा समावेश आहे.
सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
साई सुदर्शन – ७५९ धावा
सूर्यकुमार यादव – ६७३ धावा
शुभमन गिल – ६५० धावा
मिचेल मार्श – ६२७ धावा
विराट कोहली – ६१४ धावा