बीडच्या पाच क्रिकेटपटू एमपीएल खेळण्यासाठी सज्ज 

  • By admin
  • May 31, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

सुविधा कमी, पण जिद्द अफाट हाच बीड क्रिकेटचा खरा डीएनए ः आमेर सलीम 

बीड ः संघर्षाच्या मातीवरून उगम पावलेली पाच स्वप्नं आता महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या प्रकाशझोतात लखलखण्यासाठी सज्ज झाली आहेत. सुविधा कमी, पण जिद्द अफाट हाच बीडच्या क्रिकेटचा खरा डीएनए आहे असे बीड जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव आमेर सलीम यांनी सांगितले. 

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमपीएल प्रीमियर लीग स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पाच क्रिकेटपटू विविध संघांकडून खेळणार आहेत हे विशेष. क्रिकेटच्या महाकुंभात बीड जिल्ह्याचे पाच खेळाडू आपापल्या संघातून खेळताना दिसणार आहेत. बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पारदर्शक धोरणाचं हे मोठं यश मानलं जात आहे. सुविधा कमी, पण जिद्द अफाट – हाच बीडच्या क्रिकेटचा खरा डीएनए!

एमपीएल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी सचिन धस (कोल्हापूर टस्कर्स), ऋषिकेश सोनवणे (पुणेरी बाप्पा), सौरभ नवले (सातारा वॉरियर्स), देव नवले (सातारा वॉरियर्स) आणि समर्थ कदम (रत्नागिरी जेट्स) या पाच क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 

बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशननं ज्या पद्धतीने निष्पक्ष आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी निवड प्रक्रिया उभी केली, त्याचेच हे फळ आहे. मोठी प्रशिक्षण केंद्रे, ब्रँडेड सुविधांचा अभाव असूनही बीडचे खेळाडू राज्यस्तरावर चमकत आहेत, ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे.

एमपीएल म्हणजे महाराष्ट्रातील सर्वांत प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा. तिथे बीडचे प्रतिनिधीत्व होणं, म्हणजेच आपल्या मातीच्या खेळाडूंनी ‘स्टेटस’ मिळवण्याचा क्षण आहे. आज हे पाच जण मैदानात उतरलेत, उद्या बीडमधल्या प्रत्येक गल्लीत नवे सचिन, विराट आणि रोहित घडत जातील. हीच खरी प्रेरणा आहे असे सचिव आमेर सलीम यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखुदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख यांच्या वतीने निवड झालेल्या खेळाडूंना अभिनंदन करण्यात आले आणि एमपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *