मुंबई मास्टर्स बुद्धिबळ रविवारी अंधेरीत रंगणार 

  • By admin
  • May 31, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

लाखो रुपयांच्या बक्षिसांसह बुद्धिबळाचे कौशल्य अनुभवण्याची संधी

मुंबई ः शाळेची पहिली घंटा वाजण्याआधी शालेय बुद्धिबळपटूंना दुसर्‍या चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. रविवारी, १ जूनला विस्डम चेस अ‍ॅकॅडमी सहकार्याने ६ ते १५ वर्षांखालील शालेय बुद्धिबळपटूंसाठी आठ गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. 

अंधेरी पश्चिमेला वालिया महाविद्यालयात या स्पर्धेेचे आयोजन केले जाणार असून यात ४०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग लाभला असल्याची माहिती फिडे आर्बिटर आणि आयोजक अक्षय सावंत यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत शेकडो शालेय स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित असल्यामुळे यात आठ गटांत सुमारे १२० खेळाडूंना रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. या स्पर्धेत विजेत्यांवर सव्वा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार आहे. प्रत्येक गटात एकूण अव्वल पाच क्रमांकाना ४, ३, २, १.५ आणि १ हजार असे रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच पुढील पाच क्रमांकाना मेडल्स आणि आकर्षक बक्षीसे दिले जाणार असल्याची माहिती आयोजक अक्षय सावंत यांनी दिली. 

या स्पर्धेत मुले आणि मुली एकत्र खेळणार असली तरी प्रत्येक गटात मुलींसाठी ५ आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे प्रथम क्रमांकाला रोख इनाम दिले जाणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने शालेय बुद्धिबळपटू सहभागी झाले असले तरी इच्छुक स्पर्धकांना सहभागासाठी ९८२०८२३१३२ आणि ९८२०२०३८५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *