छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या संग्राम राठोडला सुवर्ण

  • By admin
  • May 31, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

राज्य मैदानी स्पर्धा

सोलापूर ः नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मैदानी स्पर्धेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या संग्राम राठोड याने सुवर्णपदक पटकावले.

संग्राम राठोड याने वीस वर्षांखालील गटात १५०० मीटर धावण्याची शर्यत तीन मिनिटे ५९ सेकंदात पूर्ण करीत ही कामगिरी केली. या कामगिरीवर त्याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्यास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक संतोष गवळी, प्राध्यापक सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते संग्रामचा सत्कार करण्यात आला. त्यांनी त्याचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जनरल सेक्रेटरी प्रा महेश माने, संचालक महादेव गवळी, प्राचार्य डॉ अरुण मित्रगोत्री आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *